Popular News

एक परीक्षा तुमची गुणवत्ता ठरवू शकत नाही-पंतप्रधान

15 जुलै : गेल्या अनेक दिवसांपासून CBSE दहावीच्या निकालाची सर्वांनां प्रतीक्षा लागलेली होती. आज CBSE बोर्डाचा 12 वीचा निकाल जाहीर झाला आहे. अनेक यशस्वी विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. मात्र ज्यांना या परीक्षेत यश मिळालं नाही त्यांना दु:खी होण्याचं कारण नाही.याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देणारं ट्विट केलं आहे.

यामध्ये मोदी म्हणातात जे विद्यार्थी त्यांच्या CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12 वी च्या निकालाने समाधानी नाहीत, त्यांना मी सांगू इच्छितो की एक परीक्षा तुम्ही कोण आहात हे सिद्ध करू शकत नाही. तुमच्यातील प्रत्येक विद्यार्थी विविध गुणांनी संपन्न आहे. तुम्ही तुमचं मनमोकळ जगा. कधीही आशा गमावू देऊ नका, नेहमीच भविष्याचा वेध घ्या..तुम्ही खूप चांगलं कराल.आज सीबीएसई बोर्डाचा 12 वी निकाल समोर आला. यामध्ये अनेक जणं चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाले, तर अनेकांना आपल्या मनाप्रमाणे मार्क मिळाले नसतील.