बीड- 143 रुग्णांना भेटली कोरोनमुक्तीची पावती!
१५ जुलै :- बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर सुरु असला तरी बीड जिल्हावासीयांना दिलासा मिळेल अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.बीड जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्नांची संख्या चिंतेचा विषय बनल्यामुळे बीडकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.दरम्यान आज आरोग्य विभागाने दिलेल्या माहिती नुसार आतापर्यंत बीड जिल्ह्यामधील १४३ रुग्ण बरे होऊन वापस घरी परतले आहेत.
९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.संपूर्ण बीड जिल्ह्यात सध्य परिस्थिमध्ये एकूण ११० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.या आकडेवारीनुसार लक्षात येते की कोरोना सुद्धा बरा होऊ शकतो.त्यामुळे घाबरू नका कोरोनाची लक्षण दिसताच घाबरून न जात डॉक्टरांना भेटा.
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!