महाराष्ट्र

‘गुरु’ पावणार;उद्या बारावीचा निकाल!

१५जुलै :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडलेला बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे .विद्यार्थ्यांनी वेबसाईटवर हा निकाल पहावा असे मंडळाने सूचित केले आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल उद्या, 16 जुलै 2020 रोजी जाहीर होणार आहे.

दुपारी 1 वाजता मंडळाच्या अधिकृत वेबसाईट्सवर हा निकाल विद्यार्थी-पालकांना पाहता येईल. याबाबतची अधिकृत माहिती नुकतीच देण्यात आली आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर बारावीचा निकाल पाहता येणार आहे.