सीबीएसई निकालात पोदार स्कूल बाहुबली!
15 जुलै :- अल्पावधीत व अल्पदिवसात नावारूपाला आलेले बीड शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कूल गेल्या सहा वर्षापासून सर्वच क्षेत्रात अव्वल येण्याचा मान प्राप्त करत आहे. क्रीड़ा क्षेत्र असो किंवा सांस्कृतिक क्षेत्र असो वा असो शैक्षणिक क्षेत्र, पोदार स्कूलचे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करतानाचे चित्र आवघ्या बीड जिल्ह्याने सदैव पाहिले आहे. सलग दुसऱ्या वर्षी पोदार इंटरनॅशनल स्कूलचा शंभर टक्के लागला आहे.
यावर्षी पोदार स्कूलमधून तब्बल 58 विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. 58 पैकी 58 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत तर पोदार स्कूलची विद्यार्थीनी स्नेहा शिंदे हिने 98.80 % संपादन करत विशेष प्रावीण्य मिळवून बीड शहरामध्ये आणि पोदारमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.पोदार स्कूलच्या श्रुती वीर या विद्यार्थीनीने 98.40 % टक्के मिळवत द्वितीय येण्याचा मान मिळवला आहे.
पोदार स्कूलमधील एकूण 10 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक टक्के मिळवले आहेत
स्नेहा शिंदे – 98.80%,
श्रुती वीर – 98.40%,
सोहम इनामदार- 95.20 %,
मयूरेश्वर निपटे- 94.80%,
नवनीत जाजू – 94.80%,
सागर शिंदे – 93.60,
गणेश धांडे – 93.20,
आशीष सारडा – 92.40 %,
मधुसूदन मालानी – 90.80 % ,
कैवल्य कुलकर्णी – 90 %
पोदार स्कूलमधील 80 % ते 90% टक्के संपादन केलेले 15 विद्यार्थी आहेत,70 % ते 80 % टक्के संपदान केलेले 16 विद्यार्थी आहेत.60% ते 70% टक्के संपादन केलेले 11 विद्यार्थी आहेत. 50% ते 60% संपादन केलेले 5 विद्यार्थी आहेत.या आकडेवरून लक्षात येते की पोदार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अभिमानास्पद घवघवित यश मिळवले आहे.या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक सर्व स्तरावर होत आहे. पोदार स्कूलचे प्राचार्य बी.डी कोटवानी सर, उपप्राचार्य सुदर्शन खनगे सर, पोदार स्कूलचे सर्व शिक्षक आणि शाळेच्या पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मन भरून कौतुक करत अभिनंदन केले आहे.