महाराष्ट्र

दहावीच्या निकालात मुलीं अव्व्ल!

15 July :- गेल्या अनेक दिवसांपासून दहावीच्या निकालाची सर्वाना प्रतीक्षा लागली होती आणि अखेर सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसई बारावीचा निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आल्यानंतर आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसईकडून सर्वोच्च न्यायालयात 15 जुलै किंवा त्यापूर्वी दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

यंदा CBSE दहावीच्या निकालात तिरुवनंतपुरम रिजन पहिल्या क्रमांकावर आहे. तिरुवनंतपुरम रिजनचा रिझल्ट 99.28 टक्के लागला आहे. सीबीएसई 12वीच्या निकालात देखील त्रिवेंद्रम रिजन टॉप वर होते.सीबीएसई दहावीच्या निकाला यंदा मुलींनी बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा 3.17 टक्के चांगला निकाल लागला आहे.CBSE 10वीच्या निकालात यंदा 93.31 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 90.14 टक्के मुलांनी यश संपादन केलं आहे. सोबतच 78.95 टक्के ट्रांसजेंडर विद्यार्थ्यांनी देखील यश मिळवलं आहे.

यंदा सीबीएसई 10वीच्या परीक्षेच्या निकालात 91.46 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात 0.36 टक्क्यांनी वाढ झाली आहे.महाराष्ट्राचा निकाल 98.05 टक्के लागला आहे. पुणे विभाग देशात टॉप 5 मध्ये आहे.