बीड

कोरोनाशी लढण्यासाठी मदत करतं Vitamin D; संशोधकांचा दावा

कोविड-19 आणि ड (डी) जीवनसत्व याच्यातील संबंधाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. कोविड-19 ची साथ सुरू झाल्यापासूनच त्याच्या संसर्गाची जोखीम कमी करण्यासाठी ड जीवनसत्वाच्या भूमिकेविषयी दावे प्रतिदावे केले जात आहेत. काहींचे म्हणणे आहे की विषाणूला रोखण्यात या जीवनसत्वाची भूमिका नगण्य आहे, तर काहीजण मानतात की हे जीवनसत्व प्रमुख भूमिका निभावू शकते. आयरिश संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, कोविड-19 मध्ये रुग्णातील ड जीवनसत्वाची पातळी आणि मृत्युदर यात महत्वपूर्ण संबंध आहे. डबलिनच्या ट्रिनिटी कॉलेजचे वैज्ञानिक म्हणतात की जीवनसत्व ड अनेक प्रकारे एसएआर-सीओवी-2 शी लढताना प्रतिकारशक्तीला मदत करू शकते. हा अभ्यास आयरिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

अलीकडच्या काळात झालेल्या काही अभ्यासातसुद्धा विषाणू संसर्गामध्ये ड जीवनसत्वाच्या भूमिकेविषयी नमूद करण्यात आले आहे. काही अभ्यासांमध्ये असेही सांगण्यात आले आहे की कोविड-19 पासून बचावासाठी किंवा त्यावर उपचारासाठी ड जीवनसत्व अधिक प्रमाणात घेऊ नये त्याने विपरित परिणाम होण्याचा धोकादेखील आहे.

myUpchar.com चे एम्स मधील डॉ. अनुराग शाही म्हणतात की ड जीवनसत्व हाडे आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. शरीरात कॅल्शियमचे शोषण आणि हाडांना मजबुती मिळण्यासाठी हे जीवनसत्व उपयोगी आहे. तसेच पेशींचा विकास आणि सूज कमी होण्यासाठीसुद्धा या जीवनसत्वाची मदत होते.

myUpchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला सांगतात की सूर्यकिरणांच्या सानिध्यात आल्यावर आपले शरीर कोलेस्ट्रॉलपासून ड जीवनसत्व बनवत असते.

संशोधनांमध्ये ड जीवनसत्वचे प्रमाण आणि साइटोकाइन यांचा सरळ संबंध दिसून आला आहे. प्रतिकारशक्तीला नियंत्रित करण्यात साइटोकाइन सिग्नलची की महत्वपूर्ण भूमिका असते. साइटोकाइन हे सूक्ष्म प्रोटीनचा एक मोठा समूह असतो, ज्यांच्या मार्फत पेशी संकेत देतात. जर साइटोकाइनमुळे प्रतिकारशक्ती अधिक प्रमाणात कार्यरत झाली तर तेदखील जीवाला घातक ठरू शकते.

वास्तविक साध्या जे अभ्यास सुरू आहेत, त्यातून हे कुठेही निष्पन्न झालेले नाही की ड जीवनसत्वामुळे कोविड-19 या आजारात काही फायदा होतो आहे. तरीही तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की ड जीवनसत्व आणि कोविड-19 यांच्यातील संबंधांना दुर्लक्षित करून चालणार नाही.

याचे कारण म्हणजे ड जीवनसत्व घेतल्याने एकूण आरोग्य आणि प्रतिकारशक्ती यावर चांगला परिणाम होतो. पण हे जीवनसत्व कोरोनो बरा करण्यात कुठलीच भूमिका निभावत नाही.

लँसेट या संशोधन मासिकाचे म्हणणे आहे की, वेगवेगळ्या देशातील साथीच्या आजारातील मृत्युदराचं प्रमाण जास्त असणं यामागे ड जीवनसत्वाची कमतरतादेखील कारणीभूत असू शकते. एजिंग क्लिनिकल अँड एक्सपेरिमेंटल रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार इटली आणि स्पेन या राष्ट्रात ड जीवनसत्वाची पातळी सरासरीपेक्षा कमी आढळून आली आहे. या दोन्ही देशात मृत्युदर खूपच जास्त आढळून आला आहे.

ड जीवनसत्व सामान्यपणे श्वसनसंबंधी आजारापासून बचाव करते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ड जीवनसत्वाचे सेवन ज्येष्ठ नागरिकांमधील मृत्युदर कमी करू शकते, ज्यांना कोविड-19 होण्याचा संभाव जास्त असतो. ज्यांच्या शरीरात ड जीवनसत्वाचा अभाव असतो अशा लोकांना संसर्गजन्य प्रतिकारशक्तीशी संबंधी आजाराचा धोका जास्त असतो. या जीवनसत्वाच्या अभावी टीबी, अस्थमा आणि फुफ्फुसांचे आजार होऊ शकतात.

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.