बीड

बीडमध्ये कोरोनाचा कहर! 19 पोझिटिव्ह रुग्ण आढळले

15 जुलै: बीडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा वाढत जाणारा आकडा चिंताजनक होत चालला आहे.कोरोनाच्या संक्रमणाची गती रोज वेगाने वाढते आहे.आणि यात आता पावसाळा सुरु आहे.पावसाळ्यात अनेक संसर्ग रोगांचा पसरावं सुरु होतो.आणि पावसाळ्यात कोरोना संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या अथक परिश्रमानंतरही रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे.आज बीड जिल्ह्यामधुन तब्बल 19 रुग्ण आढळले आहेत तर बीड शहरात 7 रुग्ण आढळले असल्याची माहीती समोर आली आहे.

आज दिनांक 15 जुलै रोजी बीड जिल्ह्यात 470 पैकी 19 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 451 निगेटिव्ह आढळले आहेत.

बीड – 07,
परळी- 06
गेवराई – 02 ( रंगार चौक शहर -01, तलवडा- 01),
आष्टी – 01
माजलगाव -01, अंबाजोगाई- 02
घाबरू नका.. काळजी घ्या.. सुरक्षित रहा..!