बीड

परळी- संचारबंदी वाढली!

परळी शहरात आणि तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 14 जुलै पर्यंत लावलेली संचारबंदी 20 जुलै पर्यंत वाढवण्यात आली आहे. परळी शहरातील एसबीआय बँकेत मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले,त्यानंतर तालुक्यातील विविध गावात देखील रुग्ण आढळून आले,त्यामुळे 5 ते 12 जुले पर्यंत लॉक डाऊन करण्यात आले होते,ही संचारबंदी सुरवातीला दोन दिवस अन आज पुन्हा सहा दिवसांकरिता वाढवण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी मंगळवारी रात्री १० वाजता आदेश काढले आहेत.
काळजी घ्या…घरात बसा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!