राज्यात आजही रुग्णवाढीचा वेग कायम
14 जुलै: राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा वाढत जाणारा आकडा चिंताजनक होत चालला आहे.कोरोनाच्या संक्रमणाची गती रोज वेगाने वाढते आहे.आणि यात आता पावसाळा सुरु आहे.पावसाळ्यात अनेक संसर्ग रोगांचा पसरावं सुरु होतो.आणि पावसाळ्यात कोरोना संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या अथक परिश्रमानंतरही रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे.
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सुरु असलेली विक्रमी वाढ कायम आहे. आज 6741 नव्या रुग्णांची भर पडली तर 213 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 2,67,665 एवढी झाली आहे. तर मृत्यूची संख्या 10695 एवढी झाली आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!