पहिल्याच दिवशी लॉकडाऊनचा फज्जा!
14 July :- कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुणे शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे .लॉकडाऊनच्या काळात शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. मात्र, औद्योगिक वसाहती, त्याचबरोबर कमी लोकसंख्येत सरकारी कार्यालय सुरु आहेत.
लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील रस्त्यांवर वाहनांची कोंडी झाली आणि लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.दरम्यान, मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा सुरु झालेल्या एमआयडीसी क्षेत्र सुरुच राहणार आहेत. परंतु जिल्ह्यात पाचपेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेल्या ग्रामपंचायतीमध्ये कटेन्मेंट झोनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
पुणे जिल्ह्यात टाळेबंदी जाहीर झाली असून या कालावधीत उद्योग, आस्थापना, कंपन्यांनी त्यांच्या कामगार, कर्मचाऱ्यांना दिलेले पास पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण क्षेत्रात प्रवासासाठी लागू रहातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.ग्रामीण भागात नागरिकांनी कामाशिवाय बाहेर फिरु नये, असेही जिल्हाधिकारी राम यांनी आवाहन केले आहे.