Popular News

ज्वेलर्सचा अविष्कार; नेकलेस कम गोल्डन मास्क!

जगात सर्वत्र कोरोना विषाणूचा कहर सुरु असल्याने कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून वाचण्याकरिता मास्क हा मानवी जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे.मास्कमध्ये आजवर आपण अनेक मास्क पहिले पण ज्वेलर्सने आचार्य वाटलं असा अनोखा अविष्कार तयार केला आहे.सर्वत्र या आविष्कारच नवल करत जोरदार चर्चा सुरु आहे.पुण्यातील ज्वेलरने तयार केलेला हा मास्क सोन्याचाच आहे, पण हा मास्क फक्त मास्कच नाही तर नेकलेसही आहे.

कोरोना काळात तुम्ही याचा मास्क म्हणून वापर करू शकता आणि जेव्हा आपल्याला मास्कची गरज पडणार नाही तेव्हा हा मास्क तुम्ही नेकलेस म्हणून वापरू शकता. 22 कॅरेट सोन्यामध्ये घडवण्यात आलेल्या नेकलेस कम गोल्डन मास्कचे वजन 124.5 ग्रॅम आहे. हा सोनेरी मास्क लवचिक असून कोणत्याही व्यक्तीला व्यवस्थितपणे परिधान करता येऊ शकतो. हा मास्क बनविण्यासाठी कारागिरांना 2 आठवडे लागले.


एन-95 मास्कवर स्टिच करुन हा नेकलेस चोकर तयार केला आहे. या मास्कमधून श्‍वास घेता यावा यासाठी सोन्याच्या बारीक जाळ्यांची खास निर्मिती करण्यात आलेली आहे. हा मास्क स्वच्छ करण्यासाठी खास असा युव्ही सॅनिटायझर बॉक्स ग्राहकांना भेट म्हणून दिला जाईल. शिवाय नेकलेस ज्या मास्कवर घडवण्यात आला आहे, तो मास्कही बदलता येऊ शकतो. या सोनेरी मास्कची किंमत तब्बल 6.5 लाख रुपये इतकी आहे.