महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

14 July :- राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा वेगाने होणार फैलाव लक्षात घेता अजूनही मुक्त संचार करणे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे.बकरी ईद साजरी करण्या संदर्भातील आज बैठक पार पडली. या बैठकीत वारी आणि गणेशोत्सवाप्रमाणे बकरी ईद देखील सावध आणि साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लीम बांधवांना केलं आहे.

वारकऱ्यांनी साधेपणाने वारी साजरी केली. लालबागच्या राजाने यावर्षी प्रतिष्ठापणा न करता आरोगयोत्सव साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. कोरोना व्हायरस रोखायचा असेल तर गर्दी होऊ देता कामा नये. मी याबाबत मुल्ला मौलवी यांच्याशी चर्चा करेन, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

सण दरवर्षी येतात, 2020 हे वर्ष कॅलेंडर मधून काढून टाकू. पुढच्या वर्षीपासून आणखी जोशात सण साजरा करण्यासाठी चांगलं आरोग्य लाभू अशी प्रार्थना करू, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.