“त्या” 7 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!
14 जुलै : राज्यातल्या किमान 7 जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन-तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने IMD वर्तवली आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मंगळवार, बुधवार आणि गुरुवार मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
भारतीय हवामान खात्याने IMD ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विशेषतः मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. याशिवाय पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतल्या घाटमाथ्यावर जोरदार वृष्टी होऊ शकते.मंगळवारी दुपारपासूनच मुंबईत विशेषतः दक्षिण मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे.मुंबई,ठाणे,रायगड,पालघर,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,पुणे,कोल्हापूर,सातारा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने IMD वर्तवली आहे.