सचिन पायलट यांची हकालपट्टी
मागील तीन दिवसांपासून त्यांची मनधरणी करण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर काँग्रेसने आता ऍक्शन घेतली आहे. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आले आहे.
याव्यतिरिक्त, त्यांचे समर्थक मंत्री विश्वेन्द्र सिंह आणि रमेश मीणा यांनाही हटविण्यात आले आहे. सचिन यांच्या जागेवर आता गोविंद सिंह डोटासरा यांना राजस्थान प्रदेश काँग्रेस कमेटीचे नवीन अध्यक्ष बनवण्यात आले आहे. तिकडे गणेश गोगरा या आमदाराला प्रांत युवा काँँग्रेस आणि हेम सिंह शेखावत यांना प्रदेश सेवा दलचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सचिन पायलट यांच्यासाठी काँग्रेसचे दरवाजे आता बंद झाले आहेत.