सिनेमा,मनोरंजन

रेखा यांनी दिला करोना चाचणीसाठी नकार!

4 जुलै : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची प्रकरणे सतत वाढत आहेत. बॉलिवूडमधील सेलिब्रिटीसुद्धा कोरोनाची लागण होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील चार जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे त्यामुळे त्यांचा बंगला बीएमसीने सॅनिटाईझ केला होता, तर अभिनेत्री रेखाच्या गार्डलाही कोरोना व्हायरस झाला होता. बीएमसीने संक्रमणाची माहिती मिळताच अभिनेत्रीचे घर सील केले. आता बातमी आहे की बॉलिवूड दिग्दर्शक जोय आख्तर यांचा बंगला पालिकेने सील केला आहे.


बॉलिवूड दिग्दर्शक झोया अख्तर यांचा बंगला रेखाच्या बंगल्याच्या शेजारीच आहे. दोन्ही बंगले जवळजवळ असल्याने महापालिकेने दक्षतेसाठी कारवाई केली आहे. अद्याप झोया अख्तर किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलेली नाही.