कसा पोहोचला महानायकापर्यंत कोरोना?
14 जुलै : प्रत्येक सुख सुविधा आणि सुरक्षेने परिपूर्ण असलेले महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली ही बातमी वाचताच कुणालाही विश्वास बसणारी नव्हतीच त्यानंतर आभिषेक बच्चन आणि त्यापाठोपाठ ऐश्वर्या,आराध्य यांच्या पण टेस्ट कोरोना पॉझिटीटीव्ह येन हे जरा चिंताजनकच वाटलं.चिंताजनक यासाठी कि प्रत्येक गोष्टीची काळजी घेणार हे कुटुंब कोणाच्याही संपर्कात न येत यांना कोरोनाची लागण होऊच कसं काय शकते हा प्रश सर्वांनां पडलेला होता.
बिग बी अमिताभ बच्चन यांनी कोरोनाव्हायसबाबत आपल्या सोशल मीडियावरून सातत्याने जनजागृती केली. शिवाय लॉकडाऊनमध्येही बच्चन कुटुंब घरातच होतं. तरीदेखील बच्चन कुटुंबाच्या घरापर्यंत कोरोना पोहोचला कसा, याबाबत आता तपास सुरू झाला आहे. बच्चन कुटुंबाच्या स्टाफची कोरोना टेस्ट करण्यात आली मात्र ती नेगेटिव्ह आली.आता त्यांची पुन्हा अँटिबॉडी टेस्ट केली जाणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेतर्फे बच्चन कुटुंबातील 26 स्टाफ मेंबर्सची कोरोना टेस्ट करण्यात आली. टेस्टमध्ये सर्व कर्मचारी कोरोना नेगेटिव्ह आहेत. आता त्यांची दुसऱ्यांदा टेस्ट केली जाणार आहे.
या सर्वांची आता अँटिबॉडी टेस्ट होणार आहे. जेणेकरून त्यांना आधी कोरोनाची लागण झाली होती की नाही हे समजेल.तसंच अमिताभ आणि अभिषेक बच्चन गेल्या काही दिवसांमध्ये कुठेकुठे गेले होते, त्या ठिकाणीदेखील तपासणी केली जाणार आहे. गेले काही दिवस अमिताभ आणि अभिषेक डबिंगसाठी बाहेर पडले होते.