भारत

कोरोनाचं थैमान;भारतात सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी वाढ

14 July :- भारतात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढत कहर चिंतेचा विषय बनला आहे.जगातील इतर देशांच्या तुलनेत एकाच दिवसात देशात सर्वात जास्त रुग्ण सापडत आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत देशात 28 हजार 498 रुग्ण सापडले तर, 553 जणांचा मृत्यू झाला.

देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 9 लाख 7 हजार 645 झाला आहे.देशात सध्या 3 लाख 11 हजार 565 सक्रीय रुग्ण आहेत. तर, 5 लाख 71 हजार 460 रुग्ण निरोगी झाले आहे. देशातील निरोगी रुग्णांची जास्त असली तरी आतापर्यंत 23 हजार 727 लोकांचा मृत्यूही झाला आहे. भारतानं केवळ 166 दिवसांत 9 लाखांचा आकडा पार केला आहे.

काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!