व्हायरल संदेशातील “लाॅकडाऊन”च्या अनुषंगाने “जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्यावतीने कोणताही यासह कोणताही संदेश देण्यात आलेला नाही” -जिल्हाधिकारी राहुल रेखावार
व्हायरल संदेशातील “लाॅकडाऊन”च्या अनुषंगाने “जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्यावतीने कोणताही यासह कोणताही संदेश देण्यात आलेला नाही”–जिल्हाधिकारी राहुल रेखावार
बीड, दि. १४:– समाज माध्यमांमधून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने झालेल्या बनावट संदेश वायरल झाला असून याच्या अनुषंगाने यावर आणि अफवांवर विश्वास ठेवू नये.
सदर संदेशा बाबत “जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्यावतीने असा कोणताही संदेश देण्यात आलेला नाही” अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे
वायरल झालेल्या संदेशामध्ये
लॉकडाऊन संदर्भात आज मा जिल्हाधिकारी यांनी vc मध्ये दिलेल्या सूचना.. या हेडिंग खाली प्रकारची माहिती दिली असून हा पूर्ण संदेश बनावट आहे
यामध्ये नमूद केलेल्या—
1) 15 ते 20 अत्यन्त कडक लॉकडाऊन* व 21 ते 30 मध्ये थोडी फार शिथिलता
2) गावात अँटी कोरोना फोर्स ACF परत कार्यान्वित करणे
3) 50 वर्षावरील व्यक्तींची परत 15 ते 20 जुलै दरम्यान तपासणी करणे
4) गावात कोणत्याही लग्नास/ वाढदिवस, वास्तू शांती,धार्मिक कार्यक्रमास परवानगी नाही, फक्त रजिस्टर्ड मॅरेज ला परवानगी असणार..याबाबत सर्वांनी दवंडी द्वारे जनजागृती करावी
5) फक्त स 7 ते 10 या वेळेत दूध व इतर आवश्यक बाबी चालू* असणार, मेडिकल दुकाने फक्त दवाखाण्याजवळील चालू राहणार
6) कृषी सेवा केंद्र दु 12 किंवा 2 पर्यंत चालू राहतील
7) सर्व बँका 15 ते 20 पर्यंत बंद राहणार* फक्त शासकीय कामांसाठी व्यवहार चालू राहतील.
8) सर्व किराणा दुकान बंद राहतील, 21 ते 30 दरम्यान दुकान न उघडता दुकानदारांना घरपोच किराणा देता येईल.
9) मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींना,व लॉकडाऊन चे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना ग्रा पं नी दंड लावणे बंधनकारक असेल अन्यथा संबंधीत ग्रासे वर कारवाई
10) कोणत्याही व्यक्ती मार्फत गरिबांना कोणत्याही प्रकारच्या किटचे वाटप होणार नाही.
अशी माहिती अथवा समाज माध्यमांमधून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने झालेल्या बनावट संदेश यावर आणि अफवांवर विश्वास ठेवू नये.