Popular News

सीबीएसई दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर!

14 जुलै:- सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयाला सांगितल्याप्रमाणे, 15 जुलै किंवा त्यापूर्वी सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर करणं अपेक्षित होतं. त्यामुळेच कालपासून दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याविषयी चर्चा रंगल्या होत्या.
दहावीचा निकाल उद्या 15 जुलै रोजी जाहीर होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ निर्माण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी ट्वीटवरून ही घोषणा केलीय. त्यांच्या या ट्वीटरवरील घोषणेने सीबीएसई दहावीचा निकाल कधी लागणार याविषयीची प्रतीक्षा संपली आहे. सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालासाठी आता फक्त 24 तासांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सीबीएसई दहावीचा निकाल पाहण्यासाठी www.cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर दहावीच्या निकाल पाहण्याच्या लिंकवर क्लिक करा.. ही लिंक नव्या टॅबमध्ये ओपन होईल किंवा नवं पेजवर तुम्ही रिडायरेक्ट व्हाल. या नव्या पेजवर तुम्हाला निकाल पाहण्यासाठी रोल नंबर, स्कूल नंबर, सेंटर नंबर आणि हॉल तिकीट आयडी भरावा लागेल, त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल उपलब्ध होईल.