महाराष्ट्र

मुंबई,पुण्यात होणार होता बॉम्बस्फोट

13 जुलै: ISKP या दहशतवादी संघटनेशी संबंधित दोन दहशतवाद्यांना NIA ने पुण्यातून अटक केली होती. रविवारी एनआयएच्या पथकांनी पुण्यात शोध घेतला आणि दोन आरोपींना अटक केली होती. नबील एस खत्री आणि सादिया अनवर शेख हे इस्लामिक राज्य खोरासन प्रांत ISKP या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते.

मुंबईसह, पुणे आणि देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांवर हल्ल्याची होती योजना होती अशी माहिती सूत्रांनी दिलीय.नबील एस खत्री पुण्यात व्यायामशाळा चालवित होता तर सदिया शेख बारामती येथील मास कम्युनिकेशन्स अँड जर्नालिझमच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. 8 मार्च 2020ला दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने एक गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी काश्मिरी दाम्पत्य जहांब सामी वानी आणि त्यांची पत्नी हिना बशीर बेग हे जामिया नगर, ओखला विहार, दिल्ली यांना अटक केली होती.