राज्यात होणार ऑनलाइन निवडणूक
13 July :- गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळापासून देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात हळूहळू सर्व सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र यामध्येही पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याची भीती आहे.
केडीएमसीचे परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांचा एक वर्षाचा कालावधी मार्चमध्ये संपुष्टात आला आहे. मात्र राज्यभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावात नव्या सभापतीची निवड होऊ शकलेली नाही. ही रखडलेली निवडणूक आता ऑनलाइन प्रक्रियेद्वारे होणार आहे.कल्याणमध्ये ऑनलाइन निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही राज्यातील पहिली ऑनलाइन निवडणूक असणार आहे.