क्राईम

खुनाचा थरार;कोयत्याने वार करून तरुणाची हत्या!

13 July :- कोरोना महामारीच्या काळात माणसाची विक्षिप्त मनोवृत्ती झाली आहे.हत्या आणि आत्महत्याच सत्र सध्या सुरु झाल्यागत घटना घडताना दिसत आहेत.पुण्यातील दत्तवाडीत मध्यरात्री शाहू वसाहतीत गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. खून झालेल्या तरुणाचे नाव अमित मिलिंद सरोदे वय 21, रा. जनता वसाहत, गल्ली नं.१५.

रविवारी रात्री अमित हा येथील शाहू वसाहतीसमोरील बालाजी होलसेलच्या जवळ थांबला असता अचानक आलेल्या तिघांनी त्याच्यावर हल्ला केला.कोयत्याने वार केल्यानंतर तरुणावर गोळी झाडण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपींना अमित सरोदे याचा खून नेमका कोणत्या कारणामुळे केला, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दत्तवाडी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात आदर्श ननावरे, बोंबल्या आणि यशवंत कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.