News

चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या पारधी समाजाच्या व्यक्तीस बेदम मारहाण. या मारहाणीत त्याचा मृत्यु

आष्टी तालुक्यातील फत्तेवडगांव येथे घडलेली घटना


चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या पारधी समाजाच्या अलीम उर्फ विशाल भोसले याला जमावाकडुन बेदम मारहाण.या मारहाणीत मृत्यु


आष्टी तालुक्यातील फत्तेवडगाव येथे पहाटे
चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या पारधी समाजाच्या व्यक्तीला काही लोकांनी एकत्र येऊन बेदम मारहाण केली.त्यामध्ये दवाखान्यात नेल्यानंतर
त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी भेट दिली.आष्टी तालुक्यातील फत्तेवडगावी पहाटे चोरीच्या उद्देशाने तीनचार जण आले होते.त्यापैकी एक जण जमावाच्या हाती लागल्याने काही लोकांनी त्याला बेदम मारहाण केली होती त्याला उपचारासाठी कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.असल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी जाहीर केले.
अलीम उर्फ विशाल नारायण भोसले असे मृत व्यक्तीचे नाव आहे.अलीम उर्फ विशाल भोसले पुंडी वाहिरा येथील रहिवासी आहे.या घटनेची मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माधव सुर्यवंशी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.या घटनेची माहिती घेण्यासाठी बीडचे अप्पर पोलीस अधिक्षक
विजय कबाडे हेही घटनास्थळी पाहणी करण्यास आले आहेत.
भोसले कुंटंबीयांनी आष्टी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या घटनेचा गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे.