बीड

बीड मध्ये कोरोनाचा कहर; आज आणखी नव्या रुग्णांची भर!

बीड जिल्ह्यात सर्वत्र कोरोना विषाणूचा कहर सुरु आहे.दिवसेंदिवस वाढता कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा चिंतेचा विषय बनला आहेत. बीड जिल्ह्यामध्ये रोज कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याचे दिसून येत आहे. 5 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्या नंतर उर्वरित 195 स्वॅबचा आहवाल प्राप्त झाला असून आणखी 9 पोझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर बीड शहरात 7 नवे पोझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.एकंदरित 24 तासात एकूण 14 पोझिटिव्ह रुग्ण निघाले आहेत कालचे आणि आजचे मिळून आणखी 433 स्वॅब प्रलंबित असल्याची माहीती आरोग्य विभागाने दिली आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टेन्स ठेवा…प्रशासनच्या सूचनेच पालन करा!