महाराष्ट्र

राज्यात आजही भरमसाठ नव्या रुग्णांची भर!

12 जुलै: राज्यात दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे.चिंतेची बाब म्हणजे राज्यात आज Active रुग्णांच्या संख्येने 1 लाखांचा ट्प्पा पार केला. आज नवे 7827 रुग्ण आढळले. त्यामुळे राज्याची एकूण संख्या 254427 एवढी झाली आहे. तर Active रुग्णांची संख्या 1 लाख 3 हजार 516 एवढी झाली आहे.

आज 3340 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण मृत्यूची संख्या 10289 एवढी झाली आहे. मुंबईत 1243 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईतल्या एकूण रुग्णांची संख्या एवढी झालीय. तर 44 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 5288 एवढी झाली आहे.

काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!