क्राईम

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

शहरात सध्या कडक लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे सर्वत्र सामसूम पसरल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच फायदा घेत एका तरुणाने जळगाव शहरातील गोलानी मार्केट परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या एका दहा वर्षीय बालिकेला एका तरुणाने भीक देण्याचा बहाणा करीत गोलानी मार्केट मधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या मुतारीमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

आरोपी आणि पीडित मुलगी घटनास्थळावरील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. मात्र, चित्रण ब्लर असल्याने आरोपीची ओळख पटवण्यात अडचण येत होती. मात्र, दोन लहान मुलांनी केलेल्या मदतीमुळे आरोपीला 24 तासांच्या आत जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.