महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा!

12 July :- कोरोना महामारीच्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या जवळपास 90 हजारांच्या आसपास कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश एसटी महामंडळाकडून काढण्यात आले आहेत. या आदेशाची काही जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी करण्यास सुरुवात देखील झाली आहे.

एसटी महामंडळाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. कर्मचारी संघटना इंटकने या निर्णयाचा विरोध करत हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. देशातील आणि राज्यातील कोणत्याही महामंडळात अथवा शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा नाही तर एसटी कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा कशासाठी अशी विचारणा देखील इंटकच्या वतीने करण्यात आली आहे.