बीड शहरात कोरोनाचा बळी, 75 वर्षीय महिलेचा मृत्यू
धक्कादायक बीड शहरात कोरोनाचा बळी, 75 तर्षीय महिलेचा मृत्यू 24 तासात 4 मृत्यू बीड : बीड शहरात काल पॉझिटिव्ह आलेल्या एका महिलांचे आज सकाळी उपचारदरम्याम मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मागील 24 तासात पाटोदा तालुक्यातील येवलवाडी व बेनसुर येथील प्रत्येकी
एक असे दोन रुग्णांवर पुण्यात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला
- तर गेवराई तालुक्यातील उमापूरच्या रुग्णाचा बीड जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यात आज सकाळी ७५ वर्षीय महिला (रा.मिलीया कॉलेज जवळ, किल्ला मैदान, बीड) या महिलेचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.
दरम्यान काल एकाने कोरोनाच्या भीतीने आत्महत्या केली होती.