बीड -कोरोनाच्या धास्तीने क्वारंटाईन व्यक्तीने घेतला गळफास
गेवराई तालुक्यातील चकलांबा जवळील बाबुलदरा तांडा येथील व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह येथे क्वारनटाईन होता या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रोजी रात्री घडली आहे.
गेवराई शहरातील कोविड सेंटर मध्ये क्वारनटाईन असलेल्या आज सायंकाळी तुकाराम जगन्नाथ जाधव वय 35 रा.बाबुलदरा तांडा चकलांबा.याला काल गेवराई शहरातील कोविड सेंटर मध्ये क्वारनटाईन करण्यात आले होते.त्याचा स्वॅब शुक्रवार रोजी घेण्यात आला होता त्याचा अहवाल येण्या आधीच त्याने क्वारनटाईन सेंटर मधील पंख्याला रुमाला च्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.ज्यावेळी तेथील न.प.कर्मचाऱ्यांनी त्याचा जेवणाचा डब्बा देण्यासाठी दार वाजवले तेव्हा दार न उघडल्याने कर्मचाऱ्यांनी बाहेरून खिडकीत डोकावून पहिले असता त्यांना गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत हा व्यक्ती आढळून आला.
या घटनेची माहिती कर्मचाऱ्याने देताच गेवराई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुरषोत्तम चोबे,फौजदार सुनील ऐटवार,विशाल प्रधान,राजू वाघमारे,आरोग्य विभागाचे डॉ.मुकेश कुचेरिया,तलाठी राजेश राठोड हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले