महाराष्ट्र

राज्य हादरले; मृत्युंचा आकडा 10 हजारांच्या पार

11 July :-राज्यत सर्वत्र कोरोना विषाणूचा कहर सुरु आहे.दिवसेंदिवस वाढता कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा चिंतेचा विषय बनला आहे.आणि यात आता पावसाळा सुरु होत आहे.पावसाळ्यात अनेक संसर्ग रोगांचा पसरावं सुरु होतो.आणि या पासवसाळ्यात कोरोना संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्येने आता दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे.राज्यात आतापर्यंत 10 हजार 116 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.तर 223 मृत्यू मागील चोवीस तासांमध्ये नोंदवले गेले आहेत.

राज्यात दिवसभरात तब्बल 8 हजार 139 नवे कोरोना बाधितांची नोंद झाली. तर मागील 24 तासांमध्ये 4 हजार 360 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2 लाख 46 हजार 600 इतकी झाली आहे. यापैकी 1 लाख 36 हजार 985 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला 99 हजार 303 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.