बीड

बीड-कोरोनाने घेतला आठवा बळी

बीड -बीडमध्ये कोरोनाचा कहर दिवसेंदिवस चिंताजनक होतं चालला आहे.कोरोना संक्रमांची गती वेगाने वाढलेली असताना आता कोरोनामुळे मृत्यू देखील होतं आहेत. गेवराई तालुक्यातील उमापूर येथील 54 वर्षीय व्यक्तीला कोरोना लक्षणे दिसू लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते,तत्पूर्वी तो रुग्ण चार दिवस नवजीवन रुग्णालयात ऍडमिट होता.

या रुग्णाला उमापूर येथून गेवराईच्या आरोग्य अधिकारी आणि पथकाने बीड जिल्या रुग्णालयात दाखल केले,त्याचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.दरम्यान शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता बीड येथील कोविड रुग्णालयात या रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.बीडमधील कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ८ वर पोहचली आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!