धक्कादायक;लग्न समारंभात निघाले दहाजण कोरोना पॉझिटिव्ह!
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावापासून वाचण्याकरिता प्रशासनाकडून नागरिकांना धार्मिक समारंभ, लग्न समारंभ राजकीय सभा घेण्यावर प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. तरी सुद्धा नागरिकांकडून या नियमांचं उल्लंघन होताना दिसत आहे.गंगाखेड तालुक्यातील रुग्णांची संख्या आज वीस ते बावीस वर पोहोचली असताना परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील जिनिंग व्यवसायिक राधेशाम भंडारी यांच्या मुलाचा विवाह लातूर येथे झाला. त्यानंतर त्यांनी 28 जून रोजी गंगाखेड येथील त्यांच्या महेश जिनिंग येथे स्वागत समारोह घेतला. हा स्वागत समारोह पार पडल्यानंतर यातील 10 जण पॉझिटिव्ह झाले.
यानंतर गंगाखेड शहर आणि तालुक्यातील अनेक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून मंगल कार्यालय बंद असताना लग्न समारोहास परवानगी नसताना अशा प्रकारे स्वागत समारोह घेतल्याने राधेश्याम भंडारी यांच्यावर गंगाखेड पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड संहिता 860 ची कलम 188 चा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी लागणारा खर्चही या व्यावसायिकाकडून वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिले आहे. याचीही कारवाई तालुका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी दिली.