राजकारण

आदित्यांचा फडणवीसांना टोला

11 July :- राज्यात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु आहे.राज्यातील कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव दिवसेंदिवस चिंताजनक होतं चालला आहे. ठाणे जिल्ह्यातील एमएमआर रिजनमधील सर्व आयुक्तांची बैठक शनिवारी कल्याणमध्ये पार पडली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितत ही बैठक झाली.त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. काही दिवसांपूर्वी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीतील तोकड्या आरोग्य यंत्रणेवर बोट ठेवत टीका केली होती. त्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की विरोधी पक्ष हेल्थ आणि डिझास्टर टूरिजम करत आहे. तर आम्ही मात्र लोकांची मदत कशी करता येईल याकडे लक्ष केंद्रीत केले आहे.

राज्याचे बरे वाईट झाले तर आनंद होणारा हा जगातील एकमेव विरोधी पक्ष असल्याची टीकाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. तसेच आम्ही जशी लोकांची काम करत आहोत, त्याप्रमाणे तुम्हीही करा असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर हे जगातील सर्वात मोठे पॅनडेमिक असून एका शहरापूरता मर्यादित नाहीये. विरोधी पक्षाने कन्स्ट्रकटिव्ह क्रीटीसीजम करावे, इतर राज्यात जाऊन तिकडचा वैद्यकीय प्रतिसाद बघावा, आम्ही कोणावरही दोष न देता काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.कोरोना हे राज्यावरच नाही तर जगावरील संकट आहे. जागतिक संकट समयी विरोधकांनी सरकारसोबत काम करणे अपेक्षित आहे.