बीड

धक्कादायक; बीडमध्ये कोरोनाचा उद्रेक!

बीड, दि.10 : बीड जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आलेले 293 स्वॅब रिपोर्ट शनिवारी पहाटे साडेतीन वाजता च्या सुमारास आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून 20 स्वॅब पॉझिटीव्ह आले आहेत. तर 273 स्वब निगेटीव्ह आहेत.बीडमध्ये 8, गेवराई 6,आष्टी 1,केज 1 तर परळीत 4 जण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती परीषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली.