News

आयसीएसई बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर

आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. देशात आयसीएसई बोर्डाचे दहावीचे एकूण २ लाख ६ हजार ५२५ तर बारावीचे एकूण ८५,६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रात दहावीचे २३,३१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर बारावीचे ३,१०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. करोना स्थितीमुळे दहावी आणि बारावी दोन्ही निकालांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली नाही.

देशभरात आयसीएसई म्हणजेच दहावीला एकूण २,०७,९०२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २,०६,५२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आयएससी म्हणजेच बारावीला एकूण ८८,४०९ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी ८५,६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

आयसीएसई बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल पुढील संकेतस्थळांवर पाहू शकता –
cisce.org
results.cisce.org

गुणवत्ता यादी नाही

यंदा कोविड – १९ च्या परिस्थितीमुळे निकालाची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार नाही, असे आयसीएसई बोर्डाने स्पष्ट केले आहे.

कसा पाहाल निकाल?

काउन्सिलच्या संकेतस्थळावर जाऊन लॉग-इन करा.
रिझल्ट्स 2020 या लिंक वर क्लिक करा.
कोर्स ऑप्शन वर जाऊन ISCE / ISC 2020 result पैकी एकाची निवड करा.
नवे पेज उघडेल. येथे आपलाअपनी युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि कॅप्चा टाकून सबमिट करा.
निकाल स्क्रीन वर दिसेल. तो डाउनलोड करा आणि एक प्रिंट घेऊन सुरक्षित ठेवा.

एसएमएसद्वारे असा मिळेल निकाल –

ICSE result through SMS: एसएमएसद्वारे कसा पाहाल निकाल वाचा –
जर वेबसाइटद्वारे निकाल पाहताना अडचण आली तर तुम्ही एसएमएसद्वारे देखील निकाल मिळवू शकता. यासाठी मोबाइलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन ICSE किंवा ISC सह आपला युनिक आयडी टाइप करा आणि 09248082883 या क्रमांकावर पाठवा.

उदाहरणार्थ,
दहावीच्या निकालासाठी टाइप करा –
ICSE 1234567

बारावीच्या निकालासाठी टाइप करा –
ISC 1234567