बीड

सांगली हादरलं; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची निर्घृण हत्या

कुपवाड (सांगली): राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगलीतील एका बड्या नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेने सांगली जिल्हा हादरला आहे. दत्तात्रेय पाटोळे असं या नेत्याचं नाव आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष होते.

सांगली आज, शुक्रवारी दुपारी हादरून गेलं. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय पाटोळे यांची तीन हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृण हत्या केली. मिरज औद्योगिक वसाहतीतील रोहिणी कोल्ड स्टोरेजमध्ये ही धक्कादायक घटना घडली. या हत्येच्या घटनेनं सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पाटोळे यांची हत्या केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपअधीक्षक संदीप सिंह गिल यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.