News

दहावी – बारावीचा निकालाची तारीख जाहीर

मुंबई, 10 जुलै : कोरोना व्हायरसचा फटका जवळपास सर्वच घटकांना बसला. दहावी आणि बारावीचे विद्यार्थीही याला अपवाद नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दहावी-बारावीचे पेपर तपासण्यासाठी विलंब झाला. त्यामुळे निकालही लांबवणीवर पडला. यातच सोशल मीडियावर निकालाच्या तारखेसंदर्भात दावा करण्यात होता. मात्र आता राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकडवाड यांनी दहावी आणि बारावीच्या निकालासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

‘राज्यात बारावीचा निकाल (HSC Result) 15 ते 20 जुलै यादरम्यान जाहीर होईल, तर दहावीचा निकाल (SSC Result) 31 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.

दरम्यान, कोरोनामुळे 23 मार्च रोजी होणार दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला असून अन्य विषयांच्या सरासरी गुणांच्या आधारावर या विषयाचे मार्क दिले जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या वर्षी इयत्ता बारावीच्या 13 लाखहून अधिक तर दहावीच्या 17 लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. बारावीचे निकाल 15 जुलै तर दहावीचे निकाल जुलै अखेरपर्यंत जाहीर केले जातील अशी माहिती मिळत आहे. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे पेपर तपासण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे निकाल लागण्यास विलंब होत असल्याचं सांगितलं जात आहे.

दुसरीकडे, 11 वीच्या प्रेवशाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 15 जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार असून निकाल लागल्यानंतर महविद्यालय निवड प्रक्रिया करता येणार असल्याची माहिती मिळाली आहे.