भारत

दहावी-बारावीच्या निकालाची तारीख जाहीर!

९ जुलै :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात सर्वत्र अनिश्चिततेचा वातावरण निर्माण झाले आहे.दिवसेंसिवस वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे प्रशासन आणि नागरिकही चिंतेत आहेत.दरम्यान आयसीएसई बोर्डाने दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल उद्याच घोषित होणार, असं जाहीर केलं आहे.

द कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन ने शुक्रवारी 10 जुलैला त्यांच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होतील, असं सांगितलं आहे.आयसीएसई कडून result.cisce.org या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर उद्या दुपारी 3 वाजता निकाल जाहीर होईल, असं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.