महाराष्ट्र

सिंधुदूर्गात प्रवेशबंदी!

9 July :- राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूचा कहर सुरु आहे.दिवसेंदिवस वाढता कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा चिंतेचा विषय बनला आहे.आणि यात आता पावसाळा सुरु होत आहे.पावसाळ्यात अनेक संसर्ग रोगांचा पसरावं सुरु होतो.आणि या पासवसाळ्यात कोरोना संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारणे शक्य नाही.राज्यात गणेशोत्सवाची मोठी धूम असते. नोकरीसाठी मुंबई आणि पुण्यात राहणारे चाकरमानी गणेशोत्सवासाठी मूळ गावी कोकणात जात असतात. पण यंदाच्या या उत्सवावर कोरोनाचं संकट आहे.

त्यामुळे सिंधुदूर्गात कोणालाही प्रेवश मिळणार नाहीये.सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यानी गणेशोत्सवासंबंधी घेतलेल्या बैठकीचे इतिवृत्त व्हायरल झालं आहे. यामध्ये 7 ऑगस्टच्या रात्री 12 नंतर बाहेरच्या जिल्ह्यातून कुणालाही सिंधुदुर्गात प्रवेश देण्यास बंदी घालण्याचा मुद्दा लिहण्यात आला आहे.