बीड

पीएम केअर फंडातून बीड जिल्ह्याला 38 व्हेंटीलेटर!

9 July :- covid-19 रुग्णांवर उपचारासाठी पंतप्रधान सहाय्यता निधी अंतर्गत बीड जिल्ह्यासाठी 38 व्हेंटिलेटर प्राप्त झाले असून त्यापैकी लोखंडी सावरगाव कोव्हीड सेंटर 9,स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय अंबाजोगाई 17, जिल्हा रुग्णालय बीड 12 याप्रमाणे व्हेंटिलेटर पुरवण्यात आले आहेत.यापूर्वी लोकनेत्या पंकजाताई  मुंडे यांनी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान च्या माध्यमातून दोन व्हेंटिलेटर दिले आहेत. कोरोना आपाद परिस्थितीत केंद्र सरकारकडून उत्तम आरोग्य सुविधेसाठी व्हेंटिलेटरची  व्यवस्था करण्यात येत आहे. बीड जिल्ह्याच्या खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या पुढाकाराने पीएम केअर फंडातून एकाच वेळी जिल्ह्याला 38 व्हेंटिलेटर मिळाल्याने अत्यावश्यक आरोग्य सुविधेसाठी व्हेंटिलेटर उपकरण उपलब्ध झाले आहेत अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली आहे.

कोरोना महामारी च्या लढ्यामध्ये केंद्र सरकारची रणनीति आणि मदत यशस्वी ठरत आहे. आरोग्य उपकरणा बरोबरच N95 मास्क, प्रतिबंधात्मक टॅबलेट आदी साहित्य केंद्र सरकार कडून तत्परतेने पुरवले जात आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत गोरगरिबांना मोफत धान्य वाटपाचा महत्वपूर्ण निर्णय ही केंद्र सरकारने घेतला आहे. राज्य सरकार मात्र पूर्णपणे  केंद्रशासनाच्या मदतीवर अवलंबून आहे.जनतेच्या आरोग्य सुविधेसाठी कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही. साहित्य उपकरणांची व्यवस्था करत नाही. हे राज्यातील जनतेचे दुर्दैव आहे. कोरोना महामारी शहरांच्या सीमा ओलांडून ग्रामीण भागात प्रभावीपणे प्रवेश केला .