Popular News

सीबीएसई बोर्डाचे आवाहन

9 July :- काही वेबसाईटवर सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या निकालाची तारीख जाहीर झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. काही वेबसाईटवर 18 जुलैला 12 वीच्या वर्गाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.तर काही वेबसाईटवर 10 वी इयत्तेचा निकाल 15 ते 17 जुलैदरम्यान जाहीर करण्यात येणार असल्याचं प्रसिद्ध करण्यात आलं होतं.

या सारख्या फेक बातम्या प्रसिद्ध झाल्याने विध्यार्थी पालकांमध्ये कन्फ्युजन निर्माण झाले आहे.मात्र, अद्याप निकालाची तारीख जाहीर झाली नसल्याचं सीबीएसई बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचे आवाहन बोर्डाने केलं आहे. सीबीएसईद्वारा निकालाची माहिती अधिकृत संकेतस्थळ cbseresults.nic.in यावर जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी या वेबसाईटवर चेक करण्यास सांगितले आहे.