सिनेमा,मनोरंजन

विनोदाचं अफलातून टायमिंग काळाच्या पदद्याआड

9 जुलै :- शोले,चायना गेट, अंदाज अपना अपना, राख, जांबाज आदी अनेक सिनेमातल्या भूमिका अजरामर करणारे विनोदाचं अफलातून टायमिंग आणि आपली अस्सल अभिनयशैली यामुळे अनेक मिमिक्री स्टार्सचे आवडते अभिनेते. अशा अवलिया अभिनेत्याचं वयाच्या 81 वर्षी निधन झालं.डायरेक्टर अनुभव सिन्हा यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. जगदीप यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांच्या अभिनयाची जादू पसरवली आहे.

‘शोले’ चित्रपटातील सूरमा भोपालीच्या व्यक्तिरेखेमुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली होती. त्याचं खरं नाव सय्यद इश्तियाक जाफरी आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरी हा जगदीपचा यांचा मुलगा आहे.