महाराष्ट्र

नांदेडात कोरोनाचा उद्रेक

नांदेड-जिल्ह्यात कोरोनाविषाणूने जबरदस्त धक्का दिलेला असून दिनांक सात रोजी २६ तर आठ जुलैस २७ म्हणजे दोनच दिवसात तब्बल ५३ रुग्णांचे अहवाल कोरोनामुळे पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडालेली आहे.काल रोजी एकूण कोरोना संशयित रुग्ण म्हणून २७६ व्यक्तींचे स्वाब घेण्यात आले होते, यापैकी १९८ निगेटिव्ह तर २७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोना गंभीर स्वरूप घेत असल्याचे दिसून येत आहे.


दोन दिवसातील तालुकानिहाय आकडेवारीचा अभ्यास केले असता नांदेड तालुक्यात पुरुष व बालक गटात १८ तर महिला व बालिका गटात ६ ,कंधार तालुक्यात पुरुष व बालक गटात तीन तर तर महिला व बालिका गटात एक, मुखेड तालुक्यात पुरुष व बालक गटात सात तर महिला व बालिका गटात ६ ,हदगाव तालुक्यात पुरुष व बालक गटात एक, देगलूर तालुक्यात पुरुष व बालक गटात एक ,बिलोली तालुक्यात पुरुष व बालक गटात एक ,किनवट तालुक्यात पुरुष व बालक गटात दोन, नायगाव तालुक्यात पुरुष व बालक गटात ६ तर परभणी जिल्ह्यातील पुरुष व बालक गटात एक असे एकूण ५३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
नांदेड जिल्ह्यात काल दिनांक आठ जुलै २०२० पर्यंत एकूण १ लाख ४७ हजार ४५२ लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून यापैकी ७४७८ संशयित रुग्ण म्हणून या व्यक्तींचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात आले होते. यात ६२३५ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह तर ५११ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह स्वरूपाचा आलेला होता.

औषधोपचारास प्रतिसाद न दिल्याने २४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. कोरोना रोगातून रोगमुक्त झाल्याने एकूण ३४१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज म्हणजे सुट्टी देण्यात आलेली होती तर सध्या १४७ इतके रुग्ण औषधोपचाराखाली उपचार घेत असल्याचे जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे सांगण्यात आले. यापैकी ९ महिला व ७ पुरुष गंभीर स्वरूपाचे असून त्यांच्यावर विशेष देखरेख करण्यात येत आहे.
सदर गंभीर परिस्थिती पाहता सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोकरावजी चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनास गरज पडल्यास लाकडाऊन अवलंबिण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
दिवसेंदिवस कोरोना रोग गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे पाहून नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर सौ. दीक्षा धबाले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लॉक डाऊन करण्याविषयीची एका पत्राद्वारे विनंती केली आहे.