एशिया कप बाबत गांगुलीने केली घोषणा
8 July :- कोरोनाबाधित रुग्णांच्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे क्रिकेट विश्व् सुद्धा ठप्प झाले आहे. क्रिकेट प्रेमींना निराश करणारी वाईट बातमी समोर आली आहे.कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एशिया कप स्पर्धा 2020 रद्द करण्यात आली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी ही घोषणा केली.नियोजित कार्यक्रमानुसार यंदाचा एशिया कप 2020 सप्टेंबर मध्ये होणार होता. यावेळी एशिया कपचं यजमान पदाची जबाबदारी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कडे होती.माहितीनुसार, वाढता कोरोना संसर्ग आणि आयपीएल साठी वेळ काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलंय जातंय.*