महाराष्ट्र

फडणवीसांच्या गाडीचा अपघात!

8 July :- विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील एका गाडीला जळगाव येथे अपघात झाला आहे. जळगावजवळ महामार्गावर नशिराबाद येथे फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीचे ब्रेक फेल होऊन गाड्यांची एकमेकांना धडक झाली. भालोदहून परतत असताना हा अपघात झाला. प्रविण दरेकरांना किरकोळ दुखापत झाल्याचं वृत्त आहे (सविस्तर वृत्त लवकरच)