महाराष्ट्र

रुग्णवाढीवर राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय!

8 July – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत.कोरोनाग्रस्त रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या चिंताजनक आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुक्त संचार करणे आवघड झाले आहे. सर्व सामान्य माणसांच्या हाताला काम नसल्यामुळे आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.नागरिकांमध्ये कोरोनाची मोठी दहशत निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यात आता कोरोना लक्षणविरहीत नागरिकांचीही टेस्ट केली जाणार आहे, अशा माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील नागरिकांच्या जास्तीत जास्त टेस्ट कराव्यात, अशा सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहे. त्यामुळे आता प्रिस्क्रीपशन शिवाय देखील कोरोना टेस्ट केल्या जाणार आहेत, असंही आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.