राज्यात रुग्णवाढ उच्चांकी!
8 July :- राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत.कोरोनाग्रस्त रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या चिंताजनक आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुक्त संचार करणे आवघड झाले आहे. सर्व सामान्य माणसांच्या हाताला काम नसल्यामुळे आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतरही गेल्या 24 तासांमध्ये उच्चांकी 6603 रुग्णांची भर पडली. तर 198 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 23 हजार 724वर गेली आहे. तर राज्यात आत्तापर्यंत 9 हजार 448 जणांचा मृत्यू झाला आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!