महाराष्ट्र

मुंबई हादरली!

8 July :- महाराष्ट्राची राजधानी कोरोनाच्या विळख्यात चांगलीच सापडली आहे. मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत.मुंबईमध्ये आज 1347 नवख्या रुग्णांची वाढ झाली आहे.तर आज 62 कॉरोनॅबहित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.मुंबईतल्या कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आकडा 5 हजारांच्या वर गेला असून आत्तापर्यंत 5064 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईमध्ये एकूण कोरोना रुग्णांची संख्या 87856 वर गेली आहे.मुंबई मधील कोरोना विषाणूचा कहर सुरु झाला असून राजधानी मुंबई कोरोनाने हादरून गेली आहे.