क्राईमबीड

बर्थडे सेलिब्रेशन पडले महागात

बीड -जिल्हातील एका वकीलाचा काल वाढदिवस होता. वकील साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या मित्र मंडळींनी कोर्टाच्या आवारात कार्यक्रम घेतला. कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता बीड शहरामध्ये लॉकडाऊन असताना वकील मंडळींनी एकत्रित येत कोर्ट परिसरातच वाढदिवस साजरा केला. यावेळी सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाबाबतचे नियम अक्षरश: पायदळी तुडवल्याचं पाहायला मिळालं. याप्रकरणी आता अकरा वकिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.