बीड

कोरोनाचा खतरा; बीडमध्ये सतरा!

बीड 8 जुलै :- संचारबंदी लागू केल्यानंतरही कोरोना संक्रमणाचा वेग चांगला वाढला असून बीड जिल्ह्यामध्ये रोज कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याचे दिसून येत आहे.आजही बीड जिल्ह्यातून सर्वाधिक 262 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीकरिता स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आली होती.स्वॅबचा अहवाल आला असून 262 स्वॅबपैकी 17 स्वॅब पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!

कोविड-19 08/जुलै/2020
आज 17 पॉझिटिव्ह
आजचे स्वॅब – 262
निगेटिव्ह – 238
अनिर्णित – 07
बीड तालुका – 06
अंबाजोगाई – 03
परळी – 06
गेवराई – 02